उस्मानाबाद

प्रा.राजा जगताप यांना उस्मानाबादभूषण व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त

प्रा.राजा जगताप यांना उस्मानाबादभूषण व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त

उस्मानाबाद राहुल खरात

टाकळी(बें)तालुका उस्मानाबाद येथील व सध्या उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागातील, प्रा.राजा जगताप(साहित्यिक) यांना सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल,नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषदेकडून दिला जाणारा २०१९चा मानाचा, उस्मानाबाद भूषण व जीवनगौरव पुरस्कार आज दि.१०/११/१९ रोजी, रायगड फंक्शन हाॅल येथे संपन्न झालेल्या समारंभात मा.श्री.शांतारामजी (सिनेकलावंत व चिञपट दिग्दर्शक,मुंबई)व मा.नानासाहेब पाटील (माजी नगराध्यक्ष उस्मानाबाद आणि डाॅ.मुकुंदराज पाटील (संस्थापक अध्यक्ष,महात्मा कबीर समता परिषद. नांदेड)यांच्या हस्ते सन्मापञ,मानपञ,तामम्रट देऊन सपत्निक गौरवीण्यात आले हापुरस्कार स्विकारतांना प्रा.राजा जगताप यांचे बरोबर त्यांच्या पत्नी सौ.संगिता जगताप,मुलगा प्रवर्तन व मुलगी प्रतिमा उपस्थित होते. यावेळी माधव जाधव(कंधार येथील साहित्यिक)
प्रा.मोहन कांबळे (सामाजिक कार्यकर्ते)प्राचार्या दर्शना देशमुख (लातूर)आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी संत कबीर यांच्या प्रतिमाचे पूजन केले.पहिल्या सञात विद्रोही कवी संमेलन संपन्न झाले दुस—या सञात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.तिस—या सञात उस्मानाबादभूषण व जीवनगौरव पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय,सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक क्षेञात कार्य करणा—या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सूञसंचालन प्राचार्या दर्शना देशमुख यांनी केले आभार डाॅ.मुकुंदराज पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button