Nashik

प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ सामान्य जनतेला मिळावा नामदार सौ भारती ताई पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार

प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ सामान्य जनतेला मिळावा नामदार सौ भारती ताई पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोरगरीब गरजू रुग्णांसाठी मान्यताप्राप्त रुग्णालयात राबविली जाते. योजनेत असणाऱ्या सर्व आजारांचे रुग्णालयांत मार्फत मोफत उपचार केले जातात. दी 23 डिसेंबर रोजी निघालेले पत्रका मुळे सर्वच रुग्णालयात किडनी स्टोन मुतखडा या आजारासाठी याच बरोबर यावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी त्यात या रुग्णालयात सोनोग्राफी असणे बंधनकारक केले आहे.

तसा आदेश पारित आहे मात्र ग्रामीण भागातील रुग्णांची उपचाराकरता फरपट होते व सर्वांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते याचबरोबर राज्यातील ग्रामीण भागात काम करत असताना सोनोग्राफी तज्ञ मिळणे अडचणीचे होऊन बसले आहे. मशीन घेणे शक्य होईल परंतु यावर उपलब्ध होणाऱ्या तज्ञांचे ग्रामीण भागात तितकेसे शक्य होत नाही.

राज्यातील बरेच तालुके असे आहेत की जिथे दोन तीन सोनोग्राफीचे सेंटर कार्यान्वित आहेत तसेच एकूण बोटावर मोजण्या इतके सोनोग्राफी सेंटर आहेत त्यामुळे रुग्णास उपचार घेण्यासाठी शहरी भागात कमीत कमी साठ-सत्तर किलोमीटरचा प्रवास नंतर उपचारासाठी दाखल करून घेण्यात कमी वेळात व वेळेवर उपचार मिळत नाही.यामुळे किडनीच्या संदर्भातील गरीब ,गरजू व पात्र रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे . या बाबींचा गंभीर विचार होऊन रुग्णांवर उपचार मिळणे सुरळीत करणे कामी व रुग्णालयाच्या अडचणी विचारात घेऊन यावर योग्य तो मार्ग काढावा यासाठी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष फोनवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी राज्यांचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे सोबत चर्चा केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button