Baramati

बारामती तहसील कार्यालयासमोर”प्रदीपच”आमरण उपोषण !

बारामती तहसील कार्यालयासमोर”प्रदीपच”आमरण उपोषण !

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – बारामती तालुक्यातील आदिवासी पारधी समाज्यातील प्रदीप भोसले यांनी बारामती तालुक्यातील मौजे मुढाळे येथील गावपुढारी व शासकीय अधिकारी यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात बारामती तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

प्रदीप भोसले यांनी ग्राम प्रशासन मंत्रालय शासन निर्णय क्र. पिडीयु-२०१८/प्र.क्र२५७/योजना१० नुसार शासकीय जमीन व घरकुल मिळणेकामी शासनाकडे पाठपुरावा करून मा.बारामती उपविभागीय अधिकारी यांनी पत्र क्र. जमीन/कावि/१०१२/२०२० दि.०७/०९/२०२० रोजी शासनास अहवाल सादर केला.त्या अहवालानुसार मा.जिल्हाधिकारी पुणे यांनी पत्र.क्र अ/सीआर/१८/२०२० पुणे दि.२८/१०/२०२० रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत मौजे मुढाळे येथील १२.४४आर जागा आरक्षित करण्यात आली.मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांच्या आदेशाला मौजे मुढाळे ग्रामपंचायत मधील गावपुढारी व ग्रामसेवक यांनी गेली दोन वर्षे “केराची टोपली”दाखवलेली आहे.

महाराष्ट्र राज्यात आदिवासी पारधी समाज्याला जातीव्यवस्था व जातिवादीच वंगण लागलेले आहे.हा जातीवाद पांढरेपोश लोकांमुळेच वाढलेला आहे.महाराष्ट्र विधिमंडळामध्ये अनुसूचित जाती-जमातीसाठी आर्थिक तरतूद मंजूर होते पण समाजहितासाठी तो निधी उपयोगात आणला जात नाही.शासनाच्या अश्या वृत्तीमुळेच आदिवासी पारधी समाज मागासलेला आहे.असे मत श्री.आनंद काळे,राज्य समन्वयक,आदिवासी पारधी परिवर्तन परिषद यांनी प्रसार माध्यमांशी व्यक्त केले.
जोपर्यंत आमचे घरकुल,आम्ही राहतो त्याच जागेवर बांधून देणार नाहीत,तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसूनच राहणार असे मत प्रदीप भोसले यांनी व्यक्त केले.आमरण उपोषणास पाठींब्या साठी बापूराव काळे राज्य समन्वयक,सौ.नंदा भोसले,सागर काळे,आकाश भोसले,अनिल भोसले,प्रदीप काळे आदी.मान्यवर उपोषणास उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button