Pune

जनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुखला इंदापूर मध्ये अटक….

जनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुखला इंदापूर मध्ये अटक….

दत्ता पारेकर पुणे

पुणे : जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांना इंदापूर पोलिसांनी इंदापूर तहसीलच्या समोर अटक केली आहे.

उजनीच्या पाच टीएमसी पाण्यावरून इंदापूर मध्ये जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना जिल्हा प्रशासनाने त्याला परवानगी नाकारली असतानाही प्रभाकर देशमुख यांनी आज इंदापूर मध्ये येऊन घोषणाबाजी करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे सकाळी प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात इंदापुर मध्ये पीपल रिपब्लिकन पार्टीचे दांडा आंदोलन झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच प्रभाकर देशमुखने जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून आंदोलन केले. त्यामुळे इंदापूर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button