Amalner

अल्पवयीन मुलगी पळवून नेल्या प्रकरणी पॉक्सो दाखल..!आरोपी अटकेत 3 दिवसांचा PCR

अल्पवयीन मुलगी पळवून नेल्या प्रकरणी पॉक्सो दाखल..!आरोपी अटकेत 3 दिवसांचा PCR

अमळनेर येथील बसस्थानकावरुन अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला मुलीसह चांदवड तालुक्यातून शेतातून अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अमळनेर येथे आणले असून मुलीच्या जाबजबाबवरून सदर व्यक्ती विरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की अमळनेर येथील बस स्थानक येथून आजी सह नात बाहेरगावी जात असताना.नात लघुशंकेला गेली पण परत आली नाही.
काही वेळ वाट पहिल्या नंतर तपास केला असता ती एका तरुणाबरोबर मोटरसायकल (क्रमांक एमएच- १८ बीपी- ९३०७) वर एका तरुणाबरोबर गेल्याची माहिती मिळाली. ही मोटरसायकल गोपीचंद बारकू पवार रा शिंदखेडा याची असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले होते.काही दिवसांपूर्वी ह्या मुलाने मुलीला पळवून नेणार असल्याची धमकी दिली होती.अशी फिर्याद आजीने अमळनेर पोलीस
स्टेशनला दाखल केली होती. त्या अनुषंगाने गोपीचंद पवार यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेणे तिचे लैंगिक शोषण करणे ह्या विरुद्ध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेस म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम 4/8/12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पीएसआय गंभीर शिंदे हे करत असून आज आरोपीला न्यायालयात हजर करून 3 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button