Amalner

क्रांतिसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या

क्रांतिसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या

ओबीसी विद्यार्थी पालक शिक्षक असोसिएशनचे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी- 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतिदिन असल्याकारणाने फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी ओबीसी शिक्षक असोसिएशन च्या वतीने आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशाच्या महान शिक्षण क्षेत्राचा क्रांतिकारी व शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून प्रतिकूल काळात सुद्धा स्त्री शिक्षणाचे महान कार्य केले त्यांची तुलना होऊ शकत नाही. देशाच्या नव्या विचारात आणि सार्वजनिक शैक्षणिक सर्वांगीण विकासात या दाम्पत्यांचे फार मोठे योगदान आहे.

फुले दांपत्यास भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पाच हजार पोस्टकार्ड संपूर्ण राज्यातून ओबीसी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष मा. विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाठवली होती व त्यासाठी जिल्ह्यातून सह्यांची मोहीम राबवली होती यासाठी अनेक पुरोगामी विचारांच्या संघटनांनी मागणी केली आहे याची जाणीव शासनाला आहे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी संपूर्ण भारतातील जनता मागणी करीत आहे या बाबतीत विविध निवेदन विविध माध्यमातून संघटनांनी महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे पाठवली आहेत.
आतापर्यंत काही व्यक्तीना भारतरत्न पुरस्कार देताना शासनाने निकषात बदल करुन दिला आहे. फुले दांपत्याचे एवढे मोठे कार्य असूनही ते दांपत्य सदर पुरस्कारापासून वंचित आहे ही शोकांतिका आहे.
फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी ओबीसी असोसिएशने केली आहे.
अमळनेर तालुक्याचे आपण कार्यक्षम आमदार असल्या कारणाने हा प्रश्न उचलून धरावा व शासन दरबारी पोहचवावा अशी मागणी ओबीसी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन , महिला जिल्हाध्यक्ष वसुंधरा दशरथ लांडगे, तालुकाध्यक्ष सोपान भवरे, शहराध्यक्ष डी.ए सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष भारती चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर चौधरी ,मनोहर पाटील, पक्षीमित्र अश्विन पाटील,समता शिक्षक परीषदेचे अजय भामरे, सल्लागार दशरथ सोमा लांडगे यांनी एका निवेदनाद्वारे आमदारांकडे मागणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button