Pandharpur

उमेदवारी फिक्स! ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता?

उमेदवारी फिक्स! ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता?

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे दिगवंत आ.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या
पोटनिवडणुकीसाठी हालचाली गुप्त असल्या तरी गतिमान झाल्या आहेत.
यामध्ये मंगळवेढ्याचे भूमिपुत्र आणि दामाजीचे चेअरमन समाधान आवताडे यांनी स्वतःहून खुलासा करीत आपणाला या पोटनिवडणूकसाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षाकडून विचारणा होत आहे.त्यामुळे आवताडे यांची तर या निवडणुकीतील उमेदवारी पक्की झाली असून ते नेमके कोणत्या पक्षाची उमेदवारी स्वीकारणार आहेत यावरूनच त्यांच्या विरोधात पंढरपूर भागातील आवताडे यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान आवताडे यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे जीवळाचे संबंध आहेत,पण सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आवताडे हे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे.त्यादृष्टीने सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत.आवताडे यांनी मागील महिन्यापासून नव्हे तर मागील ग्रामपंचायत निवडणुकीपासूनच आपली तयारी ठेवत पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये आपले उमेदवार उतरउन गावोगावी आपले बस्थान बसविण्यात यशही मिळविले आहे.त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात क्रमांक एकवरच असणारे आवताडे यांची मताची आकडेवारी पाहूनच आता उमेदवारी देण्यासाठी दोन्हीही पक्ष तयारी दाखवीत आहेत. या पोटणीवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांना तर भाजप कडून परिचारक यांच्या कुटुंबातील कोणालातरी उमेदवारी मिळेल असे त्यांच्या समर्थकांनी तर्क वितर्क सुरू केले आहेत.परंतु या पंढरपुरच्या दोन्ही प्रस्थापित आणि प्रतिस्पर्धी पैकी नेमके कोण असणार ते समाधान आवताडे यांच्या उमेदवारी वरून समजणार आहे.सध्या आवताडे यांचेही पंढरपूर भागातील भेट दौरे वाढले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठीही तितक्याच प्रमाणात गर्दीही वाढून जणूकाही उमेदवारीला पाठिंबा व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळेच आवताडे यांनी पुन्हा एकदा नशीब अजमविण्यासाठी तयारी बांधली असून कार्यकर्त्यातूनही उत्साह वाढू लागला आहे.एकंदरीत आगामी पोटनिवडणुकीतील परिस्थिती विचारात घेता समाधान आवताडे फिक्स उमेदवार तर त्यांना लढत देण्यासाठी नेमका कोण प्रतिस्पर्धी उमेदवार असेल हे लवकरच दिसून येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button