Paranda

परंडा पंचायत समीतीच्या कार्यालयाला गळती महत्वाचे रेकार्ड नष्ट होण्याची शक्यता . ५० वर्षा पुर्वीची ईमारत जिर्ण झाल्याने धोका होण्याची शक्यता .

परंडा पंचायत समीतीच्या कार्यालयाला गळती महत्वाचे रेकार्ड नष्ट होण्याची शक्यता .

५० वर्षा पुर्वीची ईमारत जिर्ण झाल्याने धोका होण्याची शक्यता .

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि १९

विकासाचे भपक्या मारणाऱ्या लोक प्रतिनिधी यांच्या दुर्लक्षा मुळे परंडा पंचायत समीतीच्या नवीन ईमारती चा प्रस्ताव अनेक वर्षा पासुन धुळखात पडला आहे .

५० वर्षा पुर्वीची ईमारत जीर्ण झाल्याने गळती लागली असुन कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असली तरीही कर्मचाऱ्यांचा ना विलाज झाला आहे कार्यालयातील भंडार विभागाला खंडरचे स्वरूप आले आहे .

परंडा पंचायत समीतीच्या नवीन ईमारतीचा प्रस्ताव मंजुरी साठी पाठवीण्यात आला आहे मात्र लोक प्रतिनिधी व वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या दुर्लक्षा मुळे अनेक वर्षा पासुन प्रस्ताव धूळ खात पडला आहे .

कार्यालयाला ठिक ठिकाणी गळती लागल्याने अनेक महत्वाचे कागदपत्र नष्ट होण्याची शक्यता आहे .
कार्यालयातील एका ठिकाण चे पत्रे उचकटून गेले आहे . सामान ठेवन्या साठी जागा नसल्याने सामान अस्तावस्त पडले आहे .

शासकीय विविध योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्या साठी , पंचायत समीती कार्यालय आस्तीत्वात आले मात्र याच कार्यालयाची दुरावस्था झाली असुन जिल्हा परिषदेच्या आलीशान इमारती मध्ये बसनाऱ्या आधिकारी व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे .
परंडा पंचायत समीतीची ईमारत जिर्ण झाल्याने ठिक ठिकाणी गळती लागली असून महत्वाचे आभिलेख नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

आधिकारी व लोक प्रतिनिधी यांनी या प्रकरणी दखल घेऊन नवीन ईमारतीचा प्रस्ताव तात्काळ मंजुर करावा अशी मागणी नागरीका मधून होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button