Nashik

कादवा च्या गाळप कार्यक्षमतेत वाढ मिल रोलर पूजन प्रसंगी अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे प्रतिपादन

कादवा च्या गाळप कार्यक्षमतेत वाढ
मिल रोलर पूजन प्रसंगी अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे प्रतिपादन

सुनिल घुमरे नासिकुप्रतिनिधी । दिंडोरी

गळीत हंगाम वेळेवर सुरू करणेसाठी यंत्र जोडणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, शेतकी विभागानेही उत्तम नियोजन केले आहे. लवकरच इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू होत असून, बि – हेवी मोलासेस वापरून इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे गाळप कार्य क्षमतेमध्ये वाढ होणार असून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. असे प्रतिपादन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले,
सन २०२२-२३ या ४६ व्यां गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते, यावेळी उपाध्यक्ष शिवाजी बस्ते यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले, व्यासपीठावर रा स वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, दिनकरराव जाधव, त्रंबकराव संधान, उपस्थित होते, प्रास्ताविक कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले, यावेळी श्रीराम शेटे म्हणाले की कादवा कारखान्यास 3500 मॅट्रिक टन चा परवाना प्राप्त झाला आहे, त्यामुळे वेळेत ऊसतोड होणार आहे, त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे असे सांगितले, यावेळी शेतकरी, सभासद व कामगार उपस्थित होते, आभार चीफ इंजिनिअर विजय खालकर यांनी मानले,

फोटो

कादवा कारखाना येथे मिल रोलर पूजन प्रसंगी बोलताना अध्यक्ष श्रीराम शेटे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button