Bollywood

बिग बॉस 15 मध्ये अश्लील चाळे..!नशीब हा शो 9 महिन्यांचा नाही..!

बिग बॉस 15 मध्ये अश्लील चाळे..!नशीब हा शो 9 महिन्यांचा नाही..!

मुंबई दूरदर्शन वरील सर्वात प्रसिध्द आणि वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस… सध्या बिग बॉस १५ सुरू झाले असून ह्या शो मधील स्पर्धकांना आता प्रेक्षक ओळखू लागले आहेत. बरेच चेहरे नवीन असल्याने पहिल्या आठवड्यात प्रेक्षक थोडे ह्या शो पासून दूर होते.पण आता पहिल्या विक एन्ड च्या वार नंतर मात्र प्रेक्षक मोठया संख्येने हा शो पाहत आहेत. सध्या ह्या शो मधील एका कपल मुळे हा कार्यक्रम चर्चेत आला आहे.पहिल्याच आठवड्यात बिग बॉस १५ कार्यक्रमातील स्पर्धक ईशान सहगल आणि मायशा अय्यर यांच्यात फारच जवळीक निर्माण झालेली दिसत आहे.

अवघ्या एक आठवड्यात ईशान आणि मायशा कमालीचे जवळ आले आहेत. नुकतेच त्यांनी एकमेकांना किस केल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यांच्या अश्या वागण्याने मर्यादेचे उल्लंघन तर झालेच आहे पण हा सिन टेलिकास्ट का केला असेही प्रेक्षकांनी विचारले आहे.प्रेक्षकांनी संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

टीआरपी साठी या दोघांचे हे चाळे दाखवले जात आहेत का? मायशा अय्यर आणि ईशान सहगल यांना कार्यक्रमातून काढून टाका अशीही मागणी केली आहे. तर स्पर्धक जय भानुशालीने तर कॅमेऱ्यासमोर हात जोडून म्हटले की नशीब हा कार्यक्रम नऊ महिने सुरू नाही. नाहीतर इथे कुटुंब तयार झाली असती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button