Shirpur

शिरपूर तालुक्यातील उमरदा येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 14 लाख रुपयांचा ओला गांजा जप्त

प्रतिनिधी : असद खाटीक शिरपूर

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील उमरदा येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 14 लाख रुपयांचा ओला गांजा जप्त करण्यात आला असून कापसाच्या शेतात सुरु असलेली गांजाची शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे
असद खाटीक
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथे एका शेतात अवैधरित्या गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय अभिषेक पाटील यांना मिळाली या माहितीच्या आधारे अभिषेक पाटील यांनी एक पथक तयार करून त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आर सिपीचे पथकही आले या दोघा पथकांनी उमरदा गावाच्या शिवारात दोन आपसिंग दित्या गुलवणे याच्या शेतात छापा टाकला त्याने कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे दिसून आले या पथकाने चार ते सहा फूट उंचीची सातशे चार किलो वजनाचे गांजाची झाडे जप्त केली आहे जप्त केलेल्या गाण्याची किंमत 14 लाख आठ हजार इतकी आहे पथकाने शेतमालक आपसिंग गुलवणे, त्यातले साथीदार व सिंग मगर वळवी सुनील बाबूलाल वळवी यांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.

शेतमालक आपसिंग गुलवणे, त्यातले साथीदार व कुवरसिंग मगर वळवी सुनील बाबूलाल वळवी हे काही कारण नसताना पोलिसांना पाहून कळाल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला पाटलाकडून पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले सदरची कापूस शेती ही आपसिंग गुलवणे यांच्या मालकीचे असून त्याने शेतात कपाशीच्या गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. पथकाने गांजाची झाडे मुळासकट उपटून काढले तर काही झाडे उपटणे अशक्य असल्याने ती वेळाने बुंध्यापासून कापण्यात आली त्यानंतर त्याचे गठ्ठे तयार करुन वजन करण्यात आले.

जिल्ह्यातील सगळ्यात मोठी कारवाई

धुळे जिल्ह्यात अवैधरित्या गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती करून विक्री केली जाते. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकाणी अवैधरित्या केल्या जाणाऱ्या कांद्याच्या शेतीवर गेल्या आठ ते नऊ महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button