Maharashtra

तांदळाने भरलेला गोंदीया कडे जाणारा ट्रक यावल पोलिसांनी पकडला रेशनिंगचा तांदुळ असल्याचा संशय

तांदळाने भरलेला गोंदीया कडे जाणारा ट्रक यावल पोलिसांनी पकडला रेशनिंगचा तांदुळ असल्याचा संशय

यावल ( शब्बीर खान )चोपड्या कडून येत असलेला व गोंदिया कडे जात असलेला रेशनींगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावरून यावल पोलिसांनी ट्रकची झाडाझडती घेतली असता यात रेशनिंगचा तांदुळ असल्याचे आढळुन आल्याचे वृत्त आहे . दरम्यान सदर ३० टन तांदूळ वाहतूक करणारा एक ट्रक पकडला आहे. जप्त केलेला माल रेशनिंग चा आहे किंवा कसा या संदर्भात पुढील कारवाई करीता तांदळाचे नमुने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
येथील चोपडा रस्त्यावर ट्रक क्रमांक एम. एच. १८ ए.सी. ०८१७ यातुन संशयास्पद तांदूळ वाहतुक केली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्यावरुन शनीवारी चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्राल पंपा जवळ सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सुशील घुगे, रोहिल गणेश, राजेश वाढे या पथकाने ट्रक पकडला व चालक केदार मुरलीधर गुजर व शिवराम सोमा कोळी दोघे रा. शिरपूर यांना ताब्यात घेतले असून पंचनामा करत तांदळाचा नमुना जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दोन दिवस झाले तरी अद्याप पावेतो जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या बाबत स्पष्टता दिली नसल्याचे पोलिसांनी सांगीतले असुन हा तांदूळ हा रेशनिंगचा असल्याचा संशय असूुन तो चोपडा येथुन गाेंदीया येथे ट्रकव्दारे पाठविण्यात येवुन तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असावा असा पोलिसांना संशय आहे जिल्हा पुरवठा अधिकारी तपासणीत काय अहवाल देतात व याकडे लक्ष आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button