Faijpur

फैजपूर शहरात पोलिसांचा रूट मार्च

फैजपूर शहरात पोलिसांचा रूट मार्च

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर येथील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात रुट मार्च करण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे तसेच समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने फैजपूर पाेलिसांनी फैजपूर शहरात संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी पाच वाजता संचलनाला सुरुवात करण्यात आली. त्यात २ अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी, १९ होमगार्डसह पोलिसांच्या फौजफाट्याने शहरात पायी शहराच्या प्रमुख मार्गांने संचलन केले.

दरम्यान, आखेगावकर यांनी नवरात्रोत्सव दरम्यान शासनाच्या अटी, शर्तींचे कोणत्याही प्रकारे कोणीही उल्लंघन करणार नाही, याबाबत समजावून सांगितले. नियमांचा भंग झाल्यास संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखे गावकर यांनी सांगितले या रूढ मार्च मध्ये सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह पीएसआय मकसूद शेख पोलिस कर्मचारी राजेश बऱ्हाटे चेतन महाजन किरण चाटे उमेश वंजारी यांचा सहभाग होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button