Amalner

सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील यांची बैठक संपन्न…

सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील यांची बैठक संपन्न…

आज दि.०५-०९-२०२१ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची सकाळी ११:३० ते १२:३० वाजे पावेतो बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत आगामी सण-उत्सव *पोळा व गणपती उत्सव तसेच पुर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या* अनुषंगाने शासनाने व मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा पोलीस अधीक्षक सो यांनी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना सांगून पोळा सणानिमित्त कुठल्याही प्रकारच्या वाद्य वाजंत्री सह किंवा साधी मिरवणूक देखील निघणार नाही. सार्वजनिक गणपती तसेच गावातील सार्वजनिक मूर्तीची उंची ही जास्तीत जास्त ४ फूट व घरगुती गणपती उंची ही जास्तीत जास्त २ फूट राहील तसेच गणपती स्थापना व विसर्जन बाबत कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही. अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना गावात जास्तीत जास्त एक गाव एक गणपती बसविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button