जामठी

जामठी येथील गावकऱ्यांनी दिले अवैध दारू विक्री करणार्यान विरोधात पोलीसात निवेदन

जामठी येथील गावकऱ्यांनी दिले अवैध दारू विक्री करणार्यान विरोधात पोलीसात निवेदन

सुरेश कोळी
जामठी ता.बोदवड- तालुक्यातील जामठी येथील नागरिकांनी अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या संदर्भात बोदवड पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आली त्या मध्ये चार ही रस्त्यावरील व गावत अनेक ठीकाणी अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय असुन नागरिकांकडुन संताप व्यक्त होत आहे गावात अवैध दारू विक्री सुरू आहे व या मुळे दारू च्या व्यसनाने बरेचसे संसार उध्वस्त होत आहे.गरीब लोक व्यसनाधीन होत आहे.

परिसरात दारू मुळे कुटुंबातील कर्त पुरूषांच्या म्रुत्यु झाल्यामुळे अनेक लोकांच्या संसाराची राख रांगोळी होते आहे त्यामुळे परीसरात अवैध दारू विक्री करण्यार्यावर कार्यवाही करून अवैध दारूचे धंदे बंद करावे व कार्यवाही न झाल्यास लोकशाही पध्दतीने अंदोलन करण्यात येईल असा इशारा जामठी येथील नागरिकांनी दिला अशी मागणी करण्यात लेखी स्वरुपात निवेदन बोदवड पोलीस स्थानकात देण्यात आली असुन तरी या अवैध दारू विक्रेत्यांनवर पोलीस प्रशासना कडून काय कारवाई करण्यात येते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निवेदनावर जामठी येथील गावातील लोकांच्या सह्या करून ते निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव,मा.आमदार चंद्रकांत पाटील ,महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव,मा.तहसीलदार बोदवड या ठिकाणी निवेदन देण्यात आले

Leave a Reply

Back to top button