Nashik

उत्खनन माफिया विरोधातील उपोषण कोरोनाच्या नावाखाली पोलीसांनी गुंडाळले ? लढाईचा निर्धार कायम-उपोषणकर्त्याची ग्वाही

उत्खनन माफिया विरोधातील उपोषण कोरोनाच्या नावाखाली पोलीसांनी गुंडाळले ?
लढाईचा निर्धार कायम-उपोषणकर्त्याची ग्वाही

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक=नाशिक जवळील विल्होळी-सारुळ परिसरात बेकायदेशीर पणे प्रचंड साधन सामुग्री चे उत्खनन सुरु असुन या द्वारे निसर्गाचे विद्रुपीकरण व पर्यावरणास प्रचंड हानी पोहचवण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे. या विरोधात कठोर कारवाई करण्याचे सोडून चक्क उत्खनन माफियांना पाठिशी घालत या विरोधात लढणार्या एकाकी तरुणावरच कोरोनाच्या नावाखाली कारवाई करत पोलीस प्रशासनाने अवैध माफियाचींच एकप्रकारे पाठराखण केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या या अनाकलनीय व अवैध धंदयाना पाठिशी घालत निरपराध व्यक्ती वरच कारवाई करण्याच्या भुमिकेवर सर्वच स्तरातुन तीव्र टिका होत आहे.
बेलगाव कुर्हे येथील दत्तात्रय गुळवे या युवकाने विल्होळी-सारुळ परिसरात सुरु असलेल्या अवैध उत्खननाविरोधात आवाज उठवत लढा पुकारला आहे.
दरम्यान गेल्या दिड वर्षांपासून हा तरुण एकाकी पणे या विरोधात लढत असुन प्रशासन मात्र ढिम्म, हलायला तयार नाही. उलट सदर तरुणांवरच खोटे नाटे गुन्हे दाखल करणे, दमबाजी करणे, प्रसंगी कायदेशीर बाबीचां गैरवापर करत अटक करणे असे प्रकार सुरु आहे.
मात्र या दडपशाही ला न जुमानता या तरुणाने आज सोमवार दि.१७ जानेवारी पासुन कोरोनाचे सर्व नियम पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला होता.
मात्र उपोषणाला बसुन अर्धा तास होत नाही तोच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोनाचे कारण दाखवत सदर तरुणाची चक्क उचलबांगडी करुन उपोषण हटवण्यात आले. दरम्यान या प्रसंगी पोलीसांनी चार सहा जण मिळुन शारीरिक बलाचा वापर करत सदर तरुणांस उपोषण स्थळावरुन हटवण्यात आले.
दरम्यान पोलीसाच्यां या तत्पर कारवाई चे अवैध धंदे चालकानीं स्वागत केले असुन या अवैध धंदयानां यापुढेही असेच संरक्षण मिळावे असे बोलले जाते आहे.

..लढाईचा निर्धार कायम-गुळवे
अवैध उत्खनन विरोधात उपोषणाला बसण्याचे आधी कळवूनही कुठलाही पत्रव्यवहार न करता, मागणीची दखल न घेता व उत्खनन माफियां विरुद्ध कारवाई न करता कोरोनाचे हास्यास्पद कारण देत मला उपोषण स्थळावरुन हटवण्यात आले.
मात्र यापुढे ही माझा लढण्याचा निर्धार कायमच असुन मी परत परत लढेन.
दत्तात्रय गुळवे

हा तर लोकशाही वर घाला -पिंगळे
जगभरात पर्यावरण संरक्षण हा विषय गाजत असतानां व बलाढ्य राष्ट्र पर्यावरण संवर्धनासाठी स्वागतार्ह पावले उचलत असतानां जिथे जिथे पर्यावरणाची लुट सुरु आहे तिथे कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज असतानाच चोर सोडून संन्याशाला शिक्षा या न्यायागत निरपराध व्यक्ती वरच कारवाई करणे हा कुठला न्याय ?
पोलीस प्रशासनाच्या या कारवाईचा आम्ही धिक्कार करतो.
तुषार पिंगळे
पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button