Amalner

भाजपच्या उर्मट पदाधिकाऱ्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल…

भाजप पदाधिकारी चंद्रकांत कंखरे विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल…

अमळनेर अवैध सावकारीच्या संदर्भातील लिखाण केले म्हणून भाजपा शिक्षक आघाडीचा तालुकाध्यक्ष चंद्रकांत सदा कंखरेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते पत्रकार धनंजय सोनार यांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारी विरुद्ध लिखाण केल्याचा राग येऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबद्दल धनंजय सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि १० सप्टेंबर २१ रोजी भा.दं. वी.१८६० चे कलम ५०४, ५०६ अन्वये चंद्रकांत कंखरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सदर व्यक्ती खूपच उद्धट असून पदाचा गैरउपयोग करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.माजी आमदार स्मिता वाघ यांच्या पदाचा व नावाचा देखील गैर वापर होत असल्याची तक्रार केली जात आहे.भारतीय जनता पक्ष हा शिस्त असलेला पक्ष आहे आणि या संदर्भात पक्ष श्रेष्ठी कडे पत्र व्यवहार करणार असल्याचे व तक्रार करावी लागणार असल्याचे देखील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.कारण एकच व्यक्ती वारंवार कोणत्या न कोणत्या स्वरूपात त्रास दायक ठरत असेल तर आणि पक्षाचे नाव बदनाम होत असेल तर हे पक्षासाठी व लोक प्रतिनिधींची घातक आहे असेही मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. लवकरच पक्ष श्रेष्ठीं नी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button