Faijpur

नाहाटा महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी साजरी

नाहाटा महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी साजरी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

भुसावळ प्रतिनिधी -येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथील मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमानाने कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. डी.गोस्वामी, मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. के. के. अहिरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ममता पाटील मॅडम उपस्थित होत्या.
तसेच मराठी विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जे. एफ. पाटील, प्रा.पी. पी. महाजन, डॉ. डी. आर. पाठक, डॉ.स्वाती महाजन, प्रा.भारती सोनवणे, प्रा.वंदना नेमाडे, प्रा.गौतम भालेराव कार्यक्रमाला उपस्थित होते.
तसेच हिंदी विभागाचे डॉ.राजेंद्र तायडे, डॉ. ललित तायडे, डॉ.सचिन राजपूत इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.
उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. डी. गोस्वामी यांनी बहिणाबाई चौधरींचा मानवतावाद स्पष्ट केला. तर प्राध्यापक डॉ. के. के. अहिरे यांनी बहिणाबाईंच्या कवितेवर प्रकाश टाकला .
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. एकता बजाज, वैष्णवी ठाकूर, संजना दुधानी, कल्याणी पराळे , स्वप्निल डोळसे,विक्रांत रोडे, खुशाल मानकर, आकांशा चांदेकर ,तारकेश्वरी सोनवणे, सागर सोनवणे, हर्षल चव्हाण इत्यादी. यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. डी. गोस्वामी व डॉ. एन. इ. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button