sawada

शहराची अस्वच्छता वाढविण्यास प्लास्टिक पिशव्या प्रथम:सावदा पालिका प्रशासन धृतराष्ट्रच्या भुमिकेत!

शहराची अस्वच्छता वाढविण्यास प्लास्टिक पिशव्या प्रथम:सावदा पालिका प्रशासन धृतराष्ट्रच्या भुमिकेत!

सावदा तालुका रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पालिका आधिच केंद्र सरकारच्या सन २०२०-२१ च्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये २१८ व्या क्रमांकावर फेकली गेली.आयाराम गयाराम सारखे सत्तेत येण्यामुळे पालिकेची व शहराची स्थिती यावरुन स्पष्ट होते की,शहरातील अस्वच्छताचे प्रमाण किती व कसे असेल हे कोणालाच सांगण्याची आवश्यकता नाही.यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या शहरात सर्वत्र ठिकाणी पेरलेल्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात दिसून येतात हे मात्र खरे आहे.

विशेषकरून पालिकेच्या दुर्गा माता व्यापारी संकूलात या ब़ंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व त्या श्रेणीत येणारे इतर प्लास्टिक वस्तू विक्री करण्याची महादेव प्लास्टिक नावाची दुकान सुरू असून सदर प्लास्टिक वस्तू येथून कायद्याचे कोणतेच धाक न बाळगता दुकान मालक पालिकेचे आरोग्य अधिकारीच्या छूप्या पाठिंब्यामुळे राजेरोसपणे नियमित विक्री करून हजारोची कमाई करीत असतो आणि यामुळे घरून स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता नागरिक बाजारात कपडी पिशवी घेऊन जात नाही.याचे परिणाम शहरात प्लास्टिक विक्री व त्याचा वापर कमी होत नसून बहुतांश घरातून शिळे खाद्यपदार्थ,भाजी व फळांच्या साली सारखे पदार्थ ह्या प्लास्टिक पिशव्यात भरून फेकल्या जातात.यामुळे गल्लीबोळात व शहरात वाटेल त्या ठिकाणी जागोजागी प्लास्टिक पिशव्यांचा उगम झाल्यासारखे दिसतात.महणून स्वच्छता अभियानाचा थेट फज्जा उडून पालिका संपूर्ण महाराष्ट्रात सदरील क्रमांकावर फेकली गेल्याचे स्पष्ट दिसून येते.तरी मुख्याधिकारी किशोर चव्हाण व प्रशासकीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button