Aurangabad

जिल्हा प्रशासनामार्फत गोगाबाबा टेकडी येथे ६ हजार वृक्षांची लागवड..

जिल्हा प्रशासनामार्फत गोगाबाबा टेकडी येथे ६ हजार वृक्षांची लागवड..

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे जिल्हा प्रशासनामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते झाला. सुमारे ६ हजार वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण हाच जीवनाचा अविभाज्य भाग होण्यासाठी सर्वांनी आग्रही असावे, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज व्यक्त केले.

शासनाकडून सातत्याने वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यात येते. शासनामार्फतही विविध पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम राबविले जातात. ‘गोगाबाबा टेकडी हरीतकरण’ हा देखील त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. जीवन आनंदी, निरोगी व निरामय जगण्यासाठी वृक्ष आपल्या जीवनात मोलाचे कार्य करतात.

कोविड -१९ मध्ये ऑक्सिजनचे महत्त्व आपणास कळलेले आहे. मात्र,आता सुदृढ जीवन जगण्याची आशा करणाऱ्या माणसांसाठी गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यक्रमातून शहरवासीयांसाठी ऑक्सिजन हब तयार होईल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button