Pandharpur

सुस्त्यात १११ झाडांचे वृक्षारोपण व १०१ जनाचे रक्तदान शिबिर….

सुस्त्यात १११ झाडांचे वृक्षारोपण व १०१ जनाचे रक्तदान शिबिर….

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ युवा प्रतिष्ठान व ब्रँड १११ यांच्या वतीने वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डीव्हीपी उद्योगसमूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटिल व एस. के. चव्हाण यांच्या हस्ते १११ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिर उदघाटन एस. के. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस निरीक्षक किरण अवचर, सरपंच कांताबाई रणदिवे यांच्या हस्ते पुष्प हार घालून करण्यात आले. यावेळी दलित स्वंयम संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, सप्तशृंगी पतसंस्थेच्या अध्यक्ष अतुल चव्हाण, गणेश चव्हाण, माधव चव्हाण, पांडुरंग कदम, आरपीआयचे रोपळे गट प्रमुख विशाल फडतरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल कसबे, अजिंक्य वाघमारे, गणेश घाडगे, साजन वाघमारे, सोमानाथ वाघमारे, अजय रणदिवे, किरण खवळे, विकास कांबळे, लहू वाघमारे, पृथ्वी रणदिवे, अजय गायकवाड आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर अंबिका नगर सुस्ते येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटिल व सरपंच कांताबाई रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिवन रणदिवे, दत्तात्रय वायदंडे, संभाजी वाघमारे, सोमनाथ रणदिवे, बालाजी कांबळे, दशरथ कसबे, हुशेन मुलाणी, सोहम लोखंडे, दत्ता रणदिवे, मुन्ना प्रक्षाळे, प्रमोद वाघमारे,
आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button