Pandharpur

पिराची कुरोली ग्रामपंचायतमधील विविध विकास कामासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना ग्राम संवाद सरपंच संघाकडून निवेदन; सतीश भुई…

पिराची कुरोली ग्रामपंचायतमधील विविध विकास कामासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना ग्राम संवाद सरपंच संघाकडून निवेदन; सतीश भुई…

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : ग्रामसंवाद सरपंच संघ ( असोसिएशन) महाराष्ट्र राज्य सरपंच संघाचे प्रदेश अध्यक्ष आजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने मा. दत्तात्रय भरणे मामा राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम ,वने, दुग्धविकास ,मत्स्यव्यवसाय व पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांची ग्राम संवाद सरपंच संघ या सरपंच संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री सतीश भुई, पुणे जिल्हाउपाध्यक्ष सौ.उज्वलाताई परदेशी तसेच बहुसंख्य सरपंच ,उपसरपंच व पदाधिकारी यांनी मौजे भरणे वाडी तालुका इंदापूर येथील भरणे मामा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील मौजे पिराची कुरोली या ग्रामपंचायत मधील बरेच वर्षापासून प्रलंबित असणारे तळवाट व विविध विकास कामे तसेच गावातील नवीन विकासात्मक कामाकरता निवेदन दिले , इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कुंभारगाव चे विद्यमान सरपंच , पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ. उज्वला ताई यांनी कुंभारगावचे ग्राम दैवत लक्ष्मीदेवी मंदिराकडे जाणारा पालखी मार्ग करण्याकरता निवेदन दिले त्यावेळी भरणे मामा यांनी तातडीने कामे पूर्ण करणे बाबत प्रशासकीय अधिकारी यांना सांगितले तसेच गेल्यावर्षी च्या महापूर मध्ये पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच पिराची कुरोली येथील भुई वस्ती, लामकाने वस्ती ,मानभाव वस्ती, जुने गावठाण, गांधिनगर या भागातील नागरिकांना नदीला महापूर आल्यानंतर पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत त्यांचे पुनर्वसन करू
रस्त्यांची सोय करणे गरजेचे आहे गेल्या वर्षी महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांच्यातील काही पूरग्रस्त शेतकरी यांना पुरामुळे झालेल्या नुकसान ची भरपाई मिळालेली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी , कदाचित यंदाही पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा करून विनंती करण्यात आली यावेळी दत्ता मामा भरणे यांना दिलेल्या निवेदनावर सकारात्मक चर्चा करून व योग्य कारवाई करण्याचे आदेश दिल्याबद्दल ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत पिराची कुरोली आपला खूप आभारी आहोत असे मत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Back to top button