kalamb

कळंब महावितरण चा मनमर्जी कारभार,तक्रारीसाठीचा फोन लागेना,नागरीकांना येतायेत भरमसाठ बिले

कळंब महावितरण चा मनमर्जी कारभार,तक्रारीसाठीचा फोन लागेना,नागरीकांना येतायेत भरमसाठ बिले

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब:- सध्या करोनाच्या साथिचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने नागरीकास घरातच राहन्यास बजावले आहे, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि मोठ्या प्रमाणात उकाडा होत असल्याने ग्रामस्थांना घरातच बसून राहणे अवघड झाले आहे.

वेळेवर मीटर रीडिंग न घेणे, अंदाजे वीजदेयक पाठवणे, ग्राहकाला कल्पना न देता नवीन मीटर बसविणे व त्याबाबत देयकातून मोठी रक्कम आकारणे, वर्षाकाठी अनामत रकमेच्या नावाखाली मन मानेल तसे शुल्क आकारणे, चुकीची देयक पाठवणे, अधिका-यांचा आडमुठेपणा आदी समस्यांमुळे कळंबकर महावितरणला चांगलेच वैैतागले आहेत.

ग्राहकांना वीज देयकाच्या माध्यमातून लुबाडले जाते. ग्राहकांनी तक्रार केलीच, तर त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून ‘आधी बिल भरा नंतर एक अर्ज द्या’ असे सांगितले जाते.

महावितरणचे फोन लागेना!

महावितरणने तक्रारीसाठी दिलेल्या फोन नंबरवर प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक ठिकाणाहून फोन लागत नसल्याने नागरिकांनी स्वतः महावितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रारी दिल्या. महावितरणने स्थानिक तक्रार केंद्रे बंद केली आहेत व कॉलसेंटरचा नंबर दिला आहे. त्याचप्रमाणे महावितरणने जे स्थानिक अधिकाऱ्यांचे नंबर दिले आहेत त्याला देखील प्रतिसाद मिळत नव्हता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button