Amalner

पिंपळे नाल्याचे नरडे अतिक्रमणाने आवळले..!धुवादार पावसाचे पाणी मग घराघरात घुसले..!नाल्यावर एका न प कर्मचाऱ्यासाठी बांधला पूल..!तक्रार करूनही प्रशासन थंड..!आणि आता पाण्याने पुकारलं बंड..!

पिंपळे नाल्याचे नरडे अतिक्रमणाने आवळले..!धुवादार पावसाचे पाणी मग घराघरात घुसले..!नाल्यावर एका न प कर्मचाऱ्यासाठी बांधला पूल..!तक्रार करूनही प्रशासन थंड..!आणि आता पाण्याने पुकारलं बंड..!

अमळनेर येथे काल झालेल्या धुवादार पावसाने धुळे रोड पिंपळे रोड येथील घरा घरांमध्ये पाणी शिरले.धुळे रोड, पिंपळे रोड आणि ढेकू रोडवर पाणीच पाणी झाले.लोकांच्या घरात गुडघ्या एव्हढ पाणी शिरले.आणि लोकांना मुंबईतील धारावीची किंवा सायन कुर्ला परिसराची अनुभूती आली.हे सर्व का घडलं ह्या मागचं कारण काय हा प्रश्न देखील लगोलग उपस्थित झाला.पिंपळे नाला हा दक्षिण उत्तर वाहतो.ह्या नाल्यावर गेल्या वर्ष दोन वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हा नाला लहान होत चालला आहे.जागेच्या वाढत्या भावांमुळे लोक जिथे जमीन फुकट मिळेल तिथे अतिक्रमण करतात.असाच प्रकार ह्या नाल्याच्या बाबतीत होत आहे. काही वर्षांपूर्वी ह्या नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांना शहाणपण शिकवणाऱ्या लोक प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली ह्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की अमळनेर येथील ढेकू रोड वरील नाल्या वर रातोरात सिमेंटचा पूल बांधण्यात आला आहे. ग्लोबल शाळेच्या समोर सूर्यवंशी अक्सिडेंट दवाखान्याच्या मागच्या बाजूला हे नाल्यावर हा पूल बांधला आहे.आज ह्या ठिकाणी एक पूल अस्तित्वात आहे. ज्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याला मर्यादा आल्या आहेत.

हा नाला अमळनेर तहसीलदार यांच्या अधिक्षेत्रात येत असून या नाल्या संदर्भात बरेच राजकारण अधिक प्रशासकीय चाली खेळी खेळल्या गेल्या आहेत. तथाकथित मा आमदार आणि आताचे तळ्यात मळयात खेळ खेळणारे यांनी एका अधिकाऱ्याला हाताशी घेऊन बरच राजकारण शिजवलं होत.आता हे बांधकाम ह्या नाल्यावर सुरू असून ह्या कडे का लक्ष गेले नाही? ह्या बांधकामाला कोणी परवानगी दिली? तहसीलदार की हरित लवाद कडून ही परवानगी मिळाली आहे? न प क्षेत्रात हा नाला येत नाही तरीही त्यांनी परवानगी दिली आहे का? की परस्परच शाळा सुरू आहे? ह्या भागातील जमिनीला प्लॉट ला चांगला भाव मिळावा म्हणून नैसर्गिक स्रोत नष्ट करण्याचा हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. हे पाप कुणाचे आहे?ह्या पापात कोण कोण सहभागी आहेत.प्रशासन डोळे बांधून बसले आहे का?कि जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे? डोळ्यात धूळ फेक आहे की जाणून बुजून डोळे झाक केली जात आहे? आता मा आमदार कुठे गेले? की सर्व शाळा सोबत मिळून सुरू आहे? येथे विचारपूस केली असता नागरिक बोलले असता अर्वाच्य भाषेत उत्तरे दिली जात आहेत. म्हणजेच जबरदस्त वरद हस्त आहे कुणीतरी मोठ्या व्यक्तीचा..!

अतिक्रमण करणार्यांना प्रशासनाने पाठीशी घातले आहे. वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

विशेष म्हणजे हा पूल एका न प कर्मचाऱ्याला जाण्या येण्यासाठी सोईस्कर व्हावे म्हणून बांधण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. तसेच ह्याच व्यक्तीने ह्या पुलाचे टेंडर देखील घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.विशेष म्हणजे जेंव्हा पुलाचे काम सुरू होते तेंव्हा तहसीलदार यांनी पाहणी करून न प ला पत्र देखील दिले आहे असे सांगितले होते पण त्या नंतर कोणतीही कार्यवाही न होता पूल मात्र पूर्ण झाला आहे. यावरून लक्षात येते की कामाची पद्धत आणि दिशा कश्या ठरतात.एका न प कर्मचाऱ्याला फक्त काही मीटर दूर जाऊन नाला ओलांडावा लागत होता तो त्रास त्या कर्मचाऱ्याला होऊ नये म्हणून हजारो रु खर्च करून पूल बनवला आणि तोही अतिक्रमण करून नाल्याचा श्वास थांबवून..!हा पूल जर बघितला तर त्याच काम,वाकडेतिकडे पणा, आणि त्याचा उपयोग यावर प्रश्न चिन्ह तर निर्माण होतच.पण तो बनविण्यामागे हेतू आणि लोकांचे नुकसान होणे पर्यावरणाचा ऱ्हास होणे.या गोष्टी पाहणे आवश्यक आहे.

एव्हढं नुकसान झाल्यानंतर तरी संबधित कामाचा ठेकेदार व त्याला कामाला लावणारे व्यक्ती वर गुन्हे दाखल आवश्यक आहे. या संदर्भाची बातमी ठोस प्रहारने 12 एप्रिल 2021 रोजी लक्षवेध करत प्रकाशित केली होती. आणि तहसीलदार यांना जागेची पाहणी करण्यासाठी बोलवले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button