Delhi

देवेन्द्र फडणवीस  आणि शरद पवार अमित शहांच्या भेटीचा फोटो व्हायरल..!सोशल मीडियावर टीकेची झोड..

देवेन्द्र फडणवीस आणि शरद पवार अमित शहांच्या भेटीचा फोटो व्हायरल..!सोशल मीडियावर टीकेची झोड..

दिल्ली भारताचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीला गेलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अनुषंगाने टीकेची झोड उठली असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून याचे उत्तर देखील आले आहे. ट्विटर वर NCP ने ह्या फोटोला शेअर करत ह्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केला गेलेला स्टंट आहे असे म्हटले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल आणि भाजपाचं सरकार स्थापन होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.आणि हा भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्या आहेत.पण मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत या मागचे कारण समजू शकले नाही. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील राजधानी दिल्लीत पोहोचले होते. विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत.ही सर्व मंडळी एकाच वेळी दिल्लीत का या चर्चेला उधाण आले आहे.यावरून एक गोष्ट तर नक्की दिसून येते आहे की वरिष्ठ पातळीवरील राजकीय नेते हे राजकारण सोडून एकमेकांचे चांगले मित्र किंवा सहकारी असतात.कार्यकर्ते मात्र एकदम जीवघेणी स्पर्धा करून आपलं आयुष्य बरबाद करत असतात.भारताच्या आता पर्यंत च्या इतिहासात सर्वच वरिष्ठ राजकीय नेते एकमेकांशी चांगले संबध ठेवून आहेत यावर प्रत्येक कार्यकर्त्यांने विचार करणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button