Aurangabad

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पायल ताई सेंगर राजपूत यांची नियुक्ति…

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पायल ताई सेंगर राजपूत यांची नियुक्ति…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक संघटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पायल ताई सेंगर राजपूत यांची नियुक्ति करण्यात आली. त्यांच्या प्रयास फाउंडेशन च्या माध्यमातून वेगवेगळे समाजिक उपक्रम राबविन्यात आले आहे. आणि यापुढेही सामाजिक उपक्रम असेच राबविण्यात येणार आहे.

कोरोना काळात रुग्ण सेवा तसेच बेरोजगार लोकांसाठी निशुल्क ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व क्लास घेणे, असे विभिन्न उपक्रम त्यांनी राबविले आणी अजुनही पायल ताई राजपूत राबवतात. त्यांच्या समाजसेवेची दखल घेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संघटनेने पायल ताई सेंगर राजपूत यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ति केली.

पायल ताई सेंगर राजपूत यांची प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर ओळख झालेली आहे. त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे कळताच त्यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button