Nashik

आशा सेविका व गटप्रवर्तकांचे थकित मानधन दिवाळीपूर्वीच अदा करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

आशा सेविका व गटप्रवर्तकांचे थकित मानधन दिवाळीपूर्वीच अदा करा
वंचित बहुजन आघाडीची मागणी

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक=येवला शहर व तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे थकित मानधन दिवाळीपूर्वीच अदा करा
या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी भारिप चे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली येवला तालुका आरोग्य अधिकारी नेहते यांना देण्यात आले. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या अंतर्गत आरोग्य सेवा लोकांपर्यंत व प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कोरोना सारख्या भयंकर विशाल रोगाच्या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असतानाही आपल्या स्वतःच्या परिवाराची व जीवाची पर्वा न करता तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिक पणे आरोग्य सेवा देण्याचे काम आशा सेविका व गटप्रवर्तक या भगिनी करत असताना कुठल्याही प्रकारचा कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केलेला नाही तरी आशा सेविका व गटप्रवर्तक यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वाढीव मानधन अद्यापही देण्यात न आल्याने ऐन दिवाळी सणासुदीच्या तोंडावर आर्थिक संकटाशी सामना करत मानसिक तणावात दिवाळीचा सण गोड करण्यासाठी तारांबळ होत आहे असे असताना अशा सेविका व गटप्रवर्तक यांचे थकित मानधन तात्काळ दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली आहे . तसेच ज्या अधिकाऱ्यांना अव्वाच्या सव्वा मासिक वेतन मिळत असताना ही त्यांचे वेतन वेळेवर अदा होत असल्याचे निदर्शनास येत आहे परंतु ज्या अशा सेविका व गटप्रवर्तक जीवाचं रान करून यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व याचा गावात फैलाव होऊ नये म्हणून. लोकांपर्यंत पोहोचून सनी टायझर मास्क वापरण्याच्या सूचना देऊन लसीकरणावर भर देत आहे तर कधी गरोदर माता, बालमृत्यू कुपोषित बालक यांच्या आरोग्याची काळजी घेत जिवाचे रान करत असताना या तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना तेही वेळेवर मिळत नसतानाही गाव कोरोना मुक्त करण्यासाठी धडपडणार्‍या अशा स्वयं सेविका व गटप्रवर्तक कांचे थकित मानधन दिवाळीपूर्वी त्यांच्या फरका सह त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.यावेळी भारिपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे,शहराध्यक्ष संदिप जोंधळे, वंचित चे युवा नेते शशिकांत जगताप ,अतुल घोडेराव,मुक्तार तांबोळी,राम कोळगेआदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button