पिळोदा/अमळनेर

बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेच्या टीम चा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग.*

बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेच्या टीम चा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग.

अविनाश पवार

जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या बालाजी विद्यालय, गांधली -पिळोदे येथील सातवीची विद्यार्थ्यांनी बूशरा आरिफ पिंजारी,विज्ञान शिक्षक श्री.संदीप वंजारी,श्रीमती प्रियंका अहिरराव यांच्या टीम ने सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले. MOM (मार्स ओर्बिट मिशन) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यासंबंधी चे मॉडेल प्रदर्शनात सादर केले.या मॉडेलने अमळनेर येथील तालुका स्तरीय प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.”जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही आम्ही यश प्राप्त करू” असा विश्वास टीमच्या मार्गदर्शक विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रियंका अहिरराव यांनी व्यक्त केला.या सोबतच विज्ञान शिक्षक संदीप वंजारी यांनीही या मॉडेल निर्मितीसाठी परिश्रम घेतले.विद्यालयाच्या या टीमला ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी चे कायम संचालक रमेश पाटील प्र.अध्यक्ष पी पी सूर्यवंशी,सचिव सुनील पाटील, कार्यकारी सदस्य, प्रसिध्द सर्जन डॉ.अनिल शिंदे, विद्यालयाचे डायरेक्टर गिरीष शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्हि. पाटील,पी डब्ल्यू दुसाने, एन वाय पाटील, आशिष शिंदे, सी वाय निकुंभ, पी जे निकम , बी ए पाटील जे एच लोहार, एन एस निळे,श्रीमती एल के पाटील, श्रीमती एस एन देसले ,विसावे सर आणि शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती एस जे पाटील ,पी एस देवरे, एस डी सूर्यवंशी, श्रीमती आर.पी पाटील, श्री मुसा शेख , एस बी सोनवणे , बी एस भिल, आर पी पवार सर्वांनी यशवंत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Back to top button