Parola

पारोळा पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्या

पारोळा पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्या

कमलेश चौधरी पारोळा

पारोळा : पारोळा पोलीसांनी दोघा मोटर सायकल चोराला पकडून त्यांच्या कडील चोरीची चार मोटार सायकली जप्त केल्या आहेत. त्या दोघांना पुढील चौकशी साठी धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पारोळा पोलीस स्टेशनचे पो. हे. कॉ. महेश पाटील, सत्यवान पवार पो. ना. सुनील साळुंखे, पो. कॉ. किशोर भोई, दीपक अहिरे असे गावात पेट्रोलिंग करीत असताना पो. निरीक्षक संतोष भंडारे यांचे मार्गदर्शनाखाली गुप्तहेरांमार्फत बातमी मिळाली की, निलेश मराठे ( वय 22 वर्ष रा. भोसले गल्ली पारोळा) यांचे कडे चोरीची मोटार सायकल आहे. त्यास धरणगाव बायपास येथे पकडले असता त्याच्या ताब्यातील मोटर सायकलच्या कागदपत्रांची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास पारोळा पोलीस स्टेशन ला आणले असता सदर मोटार सायकल चोरीची आहे असे त्याने कबुल केल्याने व सोबत ज्ञानेश्वर पाटील ( रा. राजीव गांधी नगर पारोळा) असे आम्ही दोघे मिळून तीन मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. ज्ञानेश्वर पाटील याने अशा चार ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांनीं धरणगाव, चोपडा, निपाणे अश्या ठिकाणांहून चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना धरणगाव पोलीस स्टेशन येथे गु. रु. नं. ३५१/२०२१ भा. द. वि. कलम ३७९ मधील गुन्ह्याचे चौकशी कामी ताब्यात देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button