Ahamdanagar
Trending

पारनेर तहसीलदार: ज्योती देवरे विरुद्ध 5 कोटी 94 लाख रु भ्रष्टाचार केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे दाखल.

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे विरुद्ध 5 कोटी 94 लाख रु भ्रष्टाचार केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे दाखल..

ज्योती देवरे यांच्या 5 कोटी 94 लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची लोकायुक्ताकडे तक्रार
तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ व्हायरल झाल्यापासून आमदार नीलेश लंके यांच्या विरोधात राजकीय वातावरण तापले आहे. अशातच ज्योती देवरे यांचीही जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. देवरे ऑडिओ प्रकरणामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

तहसीलदार देवरे यांनी ऑडिओत नीलेश लंके यांचे नाव न घेता आरोप केले होते. त्यामुळे आमदार लंके समर्थक तहसीलदार देवरे यांच्या विरोधात रोज नवीन काहीतरी करत असलेले दिसून येत आहेत. अशातच आमदार लंके यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके, सुहास साळके यांनी प्रसिध्द विधीतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबईतील लोकायुक्तांकडे एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तहसीलदार देवरे यांनी पाच कोटी 94 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे म्हटले आहे.

देवरे यांनी धुळे शहरात तहसीलदार असताना हजार कोटीच्या जमिनींचा गैरव्यवहार केला आहे. तिथल्या चौकशीतही निष्पन्न झाले आहे की, त्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारा विरोधात मुंबईतील लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. त्याची लवकरात लवकर सुनावणी होईल, असे अॅड. सरोदे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button