gadchiroli

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण

गडचिरोली :- दि 25 जानेवारी ज्येष्ठ नागरिक संस्था गडचिरोली च्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आमदार डॉ देवरावजी होळी , गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नप उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, भाजपचे ज्येष्ठ नेते नगरसेवक प्रमोदजी पिपरे, शिक्षण सभापती रितुताई कोलते, पाणीपुरवठा सभापती वैष्णवीताई नैताम, नप सभापती लताताई लाटकर, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी एम बरलावार, चंद्रपूर चे प्रादेशिक अध्यक्ष विजय चंदावार, सचिव संगीडवार ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सोनटक्के व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button