Amalner

निम गावातील ध्येय वेड्या वृक्षमित्र व जलमित्र भिका तात्या यांच्या कार्याला पाणी फाउंडेशन चा सलाम

निम गावातील ध्येय वेड्या वृक्षमित्र व जलमित्र भिका तात्या यांच्या कार्याला पाणी फाउंडेशन चा सलाम

अमळनेर : निम गावांमध्ये अडचणीच्या कालावधीमध्ये पाणी फाउंडेशन च्या प्रत्येक कार्यामध्ये मोलाचे योगदान देणारे भिका पाटील तात्या यांनी निम गावामध्ये पाठी मागील वर्षी सर्व गावकऱ्यांचे सोबत बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड केली होती प्रशासकीय काही अडचणीमुळे मजुरांना खूप महिने मनरेगाच्या माध्यमातून पैसे मिळत नव्हते खूप काही मजुरांनी पैसे मिळत नाही म्हटल्यावर काम करायचे बंद केले पण एकट्या भिका तात्यांनी पैसे मिळो अथवा न मिळो एक एचपी ची केक मोटर व त्याला एक हजार फूट वायर असा जवळजवळ 15000 रुपये खर्च करून वृक्षांना पाणी देण्यासाठी शाश्वत सोय केली व आपण हे वृक्ष लागवड व संगोपनाचे काम सुरू ठेवायचे या जिद्दीने काम सुरू ठेवले वृक्षांचे संगोपन केले त्यांच्या जिद्दी व चिकाटीमुळे व इतर लोकांना पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून समजून सांगुन आधार दिल्यामुळे इतर लोकांनी ही पाठी मागील वर्षी 2000वृक्ष बिहार पॅटर्न अंतर्गत जगवली आणि त्याच वृक्ष लागवडीच्या चळवळीमुळे यावर्षी निम गावांमध्ये 12000 कडुनिंबाची वृक्ष लागवड झाली आहे त्यांच्या माध्यमातून 240 मजुरांना पावणे तीन वर्ष करिता बिहार पॅटर्न अंतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच मागील वर्षीच्या 40 मजुरांना देखील या वर्षी आणि पुढील वर्षी बिहार पॅटर्न अंतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे तर अशा ध्येयवेड्या जिगरबाज प्रयत्न वादी भिका तात्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून जगवलेल्या पाठी मागील वर्षीच्या वृक्षांची पाहणी केली मन अगदी भारावून गेलं एका व्यक्तीच्या प्रयत्न वादामुळे भविष्यामध्ये एवढा मोठे प्रचंड काम होईल याची कल्पनासुद्धा नव्हती तसेच भिका तात्या समृद्ध गाव स्पर्धेतील कोणतेही काम असो अगदी वेळेत इतर कोणी येवो अथवा न येवो पण आपण स्वतः खूप काम असताना सुद्धा वेळ देऊन गाव समृद्ध बनण्यासाठी प्रत्येक कार्यामध्ये मोलाचे योगदान देत असतात अशा देह वेड्या वृक्षमित्र व जलमित्र भिका तात्या यांना पाणी फाउंडेशन चा सलाम????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button