World

पँडोरा पेपर्स प्रकरण..!भारतातील मोठ मोठ्या दिगग्ज लोकांची यादीत नावे..!सचिन तेंडुलकर पासून ते अंबानी जगभरातील प्रतिष्ठित नावे उघडकीस काय आहे प्रकरण..!

पँडोरा पेपर्स प्रकरण..!भारतातील मोठ मोठ्या दिगग्ज लोकांची यादीत नावे..!सचिन तेंडुलकर पासून ते अंबानी जगभरातील प्रतिष्ठित नावे उघडकीस काय आहे प्रकरण..!

असे म्हणतात की पडद्याआड काय आहे? आणि ते लपुनच असेल तर बरं पण अचानक पणे हा पडदा उघडला तर पडद्याआड कोट्यवधींची मालमत्ताही लपलेली असते हे निदर्शनास आले आहे. पँडोरा पेपर्समधून जगभरातल्या काही राजकारणी आणि धनाढ्य लोकांच्या अशाच गुप्त आणि छुप्या मालमत्तेचे संकेत मिळाले आहेत.

नुकत्याच दस्तावेजांमधून जी माहिती समोर आली आहे त्यात सचिन तेंडुलकर अनिल अंबानींपासून, जॉर्डनचे राजे आणि अनेक देशांच्या आजी माजी राजकारण्यांची तसंच काही गुन्हेगारांची नावही आहेत. की ज्यांची करोडो रु ची संपत्ती लपवली आहे. यात एकूण 90 देशांतल्या 300 हून अधिक राजकारण्यांचा समावेश आहे.

काहींनी मालमत्ता लपविली तर कर चुकविण्यासाठी देशाबाहेर गुंतवणूकी केल्या तर काही लोकांनी अवैध रित्या करोडो रुपये कमावले आहेत असा कागदोपत्री पुरावा पँडोरा पेपर्स देतात.

पँडोरा पेपर्स..

या माहितीत 64 लाखांहून अधिक डॉक्यूमेंट्स, 12 लाखांहून अधिक ईमेल्स अशा एकूण 1 कोटी 19 लाख फाईल्स आणि 2.94 टेराबाईट डेटाचा समावेश आहे.

जगभरातल्या 117 देशांतील 600 हून अधिक पत्रकारांनी या फाईली तपासल्या आणि त्यांचे रिपोर्ट्स वेगवेगळ्या वृत्तसंस्था या आठवड्यात प्रकाशित करतायत.

ICIJ चा मोठा खुलासा..

पँडोरा पेपर्स नावानं ओळखला जाणारा माहितीचा हा संच इंटरनॅशनल कॉन्झॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स अर्थात आयसीआयजे या संस्थेकडे गुप्त सूत्रांनी लीक केला आहे.

ही संस्था अमेरिकेत असून यात जगभरातील शोधपत्रकारांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय आवाका असलेल्या शोधपत्रकारितेसाठी, विश्लेषणासाठी हे पत्रकार एकमेकांना सहकार्य करतात. त्यात बीबीसी पॅनोरमा, गार्डियन आणि भारतील इंडियन एक्सप्रेस अशा मोठ्या पत्रकारिता टीम्सचाही समावेश आहे.

2016 साली या संस्थेनं पनामा पेपर्स अहवाल सादर केला होता आणि जगभरातील सत्ताधारी, श्रीमंत लोक पैसा लपवण्यासाठी किंवा टॅक्स चुकवण्यासाठी पनामासारख्या देशातील कंपन्यांचा वापर करत असल्याची माहिती समोर आली होती. आता पँडोरा पेपर्स मध्ये चौदा लॉ फर्म्सच्या फाईलींचा समावेश आहे.

पनामा,परोडाईज पँडोरा पेपर्स ह्या सर्वांसंदर्भात माहिती वाचताना कुठलीही बातमी वाचताना शेल कंपनी, ऑफशोअर आणि टॅक्स हेवन हे चार शब्द वारंवार येतात.

शेल कंपनी म्हणजे अशी कंपनी जी केवळ कागदावरच अस्तित्वात आहे. एखादी मालमत्ता या कंपनीच्या मालकीची दाखवली जाते आणि प्रत्यक्षात शेअर होल्डर्स म्हणून काही व्यक्ती त्या मालमत्तेचा केवळ वापर करत असल्याचं दाखवलं जातं.

अनेकदा अशी एखाद्या शेल कंपनीची मालकी दुसऱ्या शेल कंपनीकडे असते आणि त्यामुळे मूळ मालक शोधणं कठीण जातं.

सध्या सचिन त्याची पत्नी अंजली आणि सासरे आनंद मेहता यांची ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समधील एका कंपनीचे लाभार्थी म्हणून नोंद आहे.

पनामा पेपर्स समोर आल्यावर इतर अनेकांनीही अशा कंपन्यांमधून पैसा काढून घेतला होता. पण तो लपवण्याचे नवे मार्ग शोधून काढले.
अनिवासी भारतीय म्हणजे NRI व्यक्तींसाठी भारतातले नियम तुलनेनं शिथिल असतात आणि म्हणून काही धनाढ्यांनी NRI नातेवाईकांचा तसंच परदेशातलं नागरिकत्व असलेल्यांचा वापर केल्याचं पँडोरा पेपर्सविषयी इंडियन एक्सप्रेसच्या तपासातून समोर आलं आहे.

युकेमधील कोर्टात दिवाळखोरी जाहीर करणारे उद्योगपती अनिल अंबानी, हे एकूण 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढच्या किंमतीच्या 18 ऑफशोअर कंपन्यांमध्ये भागधारक आहेत असे हे पेपर्स सांगतात.

टॅक्स हेवन्समध्ये किती पैसा गुंतला आहे?

कर वाचवण्यासाठी कायद्यात अशा पळवाटा सर्वश्रुत आहे. एखाद्या देशातलं सरकार अस्थिर असेल किंवा आपल्यावर कुणाचा हल्ला होण्याची शक्यता असेल, तर कायदेशीरपणे लोक देशाबाहेर अशा कंपन्यांमध्ये पैसा गुंतवतात

या नियमांचा फायदा उठवत असल्याचं पँडोरा पेपर्सनं दाखवून दिलंय असं आयसीआयजेचे प्रमुख जेरार्ड रायल सांगतात.

पाकिस्तानमध्येदेखील पँडोरा पेपर लीक प्रकरणावरून खळबळ माजली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळील व्यक्तींसह जवळपास ७०० व्यक्तींचे नावे या पेपर लीकमध्ये आली आहेत. तर, दुसरीकडे आता पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button