Pandharpur

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळूचोरी विरोधात पुन्हा मोठी कारवाई सहा लाखांचा मुद्देमाल जप्त तर दोघांना अटक

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळूचोरी विरोधात पुन्हा मोठी कारवाई सहा लाखांचा मुद्देमाल जप्त तर दोघांना अटक

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून पंढरपूर तालुका पोलिसांच्या वतीने सातत्याने अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत असली तरी अवैध वाळू उपसा व अवैध दारू विक्रीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.काल १३ जून रोजी पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावच्या हद्दीत अवैध वाळू उपशावर कारवाई करत पोलिसांनी तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मोठ्या प्रमाणात तालुका पोलिसांकडून कारवाया केल्या जात असल्या तरी वाळू चोर मात्र अद्यापही निर्ढावलेले दिसत आहेत.सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी ग्रामीण घटकातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल झेंडे व पंढरपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली व पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे दि 13/06/2021 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे सपोनि खरात यांनी गुप्त माहिती काढून सदर माहिती प्रमाणे सरकोली मधून काही जण वाळू चोरी करून पुळूज मधून पुढे जात असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली.त्याप्रमाणे त्यांचेकडील पथकाने पुळूज येथे थांबून सरकोली बांधऱ्याकडून दोन पिकअप वाहन वाळू चोरी करून येताना दिसले असता पुळूज मध्ये सदरच्या दोन्ही वाहनांना थांबवून त्यांचेवर कारवाई केली.सदर छाप्या मध्ये 2 पिकअप व त्यामध्ये भरलेली वाळू असा एकूण 06,06,000 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरच्या वाळूचोरीबाबत अभिजित पंडीत कराळे (वय 22 वर्ष) व हसन शरीफ इनामदार (वय 24 वर्ष) दोघे रा- सरकोली ता पंढरपुर यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक चंदनशिवे हे करत आहेत
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षिक तेजस्वीनी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे नेतृत्वाखाली सपोनि आदिनाथ खरात ,पोलीस शिपाई शिवाप्पा बिरसदार पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंशी, होमगार्ड सचिन मदने, होमगार्ड सोमनाथ सूळ यांनी पार पाडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button