Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चोरीच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस पथकाची कारवाई…

पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चोरीच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस पथकाची कारवाई…

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील गेल्या महिन्यात १८ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास देगाव ता.पंढरपूर हद्दीतील बनगोसावी पेट्रोलियमजवळ तीन अनोळखी तरुणांनी पल्सर २२० गाडी आडवी लावून गाडीला कट का मारला म्हणून योगेश दादासाहेब जाधव (रा.भोसले वस्ती तुंगत) यांच्याजवळ असलेली ५० हजारांची रोकड बळजबरीने चोरून नेली होती.याबाबत त्याच दिवशी पंढरपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.चोरीतील आरोपींचा तपास करण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वात सपोनि शंकर ओलेकर, सपोनि खरात व उपविभागीय अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले होते.चोरीच्या गुन्ह्याचा गेल्या वीस दिवसांत कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पंढरपूर येथील १.लखन रायाप्पा काळूखे (वय-२३वर्षे ) रा.ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी,२.आशु दत्ता जाधव (वय-२० वर्षे) सेंट्रल नाका,भोसले चौक पंढरपूर ३.गणेश बिरु कांबळे (वय-२२ वर्षे ) सेंट्रल नाका भोसले चौक पंढरपूर संशयित म्हणून अटक करून तपास केला असता गुन्ह्याचा उलघडा झाला आहे.तिन्ही आरोपींना ०४/०६/२०२१ रोजी अटक केलेली असून त्यांच्याकडून चोरीच्या ५० हजारांच्या रकमेपैकी ४४००० रुपये रोकड व गुन्ह्यात वापरलेली २२० पल्सर गाडी जप्त करण्यात आली आहे.यापूर्वी देखील यातील दोन आरोपींवर विविध गुन्ह्यात शहर व ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.सदर कामगिरी सपोनि खरात,सपोनि ओलेकर, पोह उबाळे,पोह सुधीर शिंदे,पोह राजा गोसावी,पोकॉ भराटे, पोकॉ अन्वर अत्तार यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button