Pandharpur

कोणतीही करवाढ नसलेले पंढरपूर नगरपरिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक सादर… कोरोनाच्या पार्श्व भूमीवर कोणतीही करवाढ नाही मात्र शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध

कोणतीही करवाढ नसलेले पंढरपूर नगरपरिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक सादर…
कोरोनाच्या पार्श्व भूमीवर कोणतीही करवाढ नाही मात्र शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचे 2021 2022 चे वार्षिक अंदाजपत्रक आज नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सादर करण्यात आले 169 कोटीची अंदाजपत्रक सादर करताना शहर विकासाकरता विविध प्रकारच्या 29 योजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला त्यामध्ये 15 वा वित्त आयोग दहा कोटी नगरोत्थान राज्यस्तर दहा कोटी जिल्हास्तर पाच कोटी अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा योजना दहा कोटी विशेष रस्ते अनुदान दोन कोटी प्रधानमंत्री आवास योजना दहा कोटी अशा विविध योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी दिल्यानंतर 2 लाख 42 हजार 792 इतका रकमेचा शिलकी अंदाजपत्रक आज सभागृहासमोर सादर करण्यात आले यावेळी विविध विषयांवर नगरसेवकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली परंतु कोरोनाच्या संकट पाहता कोणतीही करवाढ न करता शहराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे नागरिकांच्या सुविधांचा विचार करून हे अंदाजपत्रक सादर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांनी माध्यमांना दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button