Rawer

रावेर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदीं प्रतिक भारंबे यांची निवड

रावेर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदीं प्रतिक भारंबे यांची निवड

मुबारक तडवी रावेर

रावेर : भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्याची बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा युवा मोर्चाची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून त्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा रावेर तालुका उपाध्यक्ष पदी सावदा येथील प्रतिक भानुदास भारंबे यांची निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रंजना पाटील, किसान मोर्च्यांचे प्रमुख श्री.सुरेश भाऊ धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री पद्माकर महाजन, माजी जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, गोपाळ नेमाडे, श्रीकांत महाजन, प.स.सदस्य जितू पाटील, हरलाल कोळी, सोशल मीडिया तालुका संयोजक, जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, नगरसेवक, आघाळ्यांचे अध्यक्ष व सदस्य, गट व गण प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख तसेच तालुक्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button