Pandharpur

पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बदली : मुंबई मध्ये होणार उपायुक्‍त

पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बदली : मुंबई मध्ये होणार उपायुक्‍त

रफीक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे . सोमवार पासून ते मुंबई येथे नगरपालिका प्रशासन संचालनालय ( वरळी ) उपायुक्त म्हणून पदभार पाहतील. नपा मुख्याधिकारी श्रेणी-1 वरून मुख्याधिकारी निवडश्रेणी अशी त्यांची पदोन्नती गेल्या दोन दिवसापूर्वी जाहीर झाली होती त्यानुसार आज नगर विकास मंत्रालयाने या सर्व निवडश्रेणी मुख्य अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या यामध्ये श्री मानोरकर यांना मुंबई येथे संधी देण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये मानोरकर यांनी कोरोना महामारी च्या कालावधीमध्ये उल्लेखनिय कार्य केले . तसेच त्यांच्या कालावधीमध्ये नामसंकीर्तन सभागृहाचे काम मोठ्या प्रमाणात मार्गी लागले आणि निधीही प्राप्त झाला प्रतिकात्मक आषाढी यात्रेच्या निर्बंधामध्ये त्यांनी प्रभावी काम केले कोकण- दोन विभागातील बदली झाल्यानंतर त्यांना आता उपायुक्त पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे .पंढरपूर मुख्याधिकारी म्हणून अरविंद माळी आणि महेश रोकडे यांची नावे चर्चेत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button