Pandharpur

पंढरपूर शहर पोलिसांनी विविध गुन्हे उघडकीस आणून केली आरोपींना अटक.

पंढरपूर शहर पोलिसांनी विविध गुन्हे उघडकीस आणून केली आरोपींना अटक.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध गुन्ह्याचा तपास करीत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे, दि२०डिसेंबर रोजी आगरी धर्मशाळा येथे वसई येथील चिंतामणी माळवी यांचा ३लाख २८हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता, या प्रकरणी कसून तपास करीत पारस मेहडा वय,२० रा. बडवे चर, झोपडपट्टी, पंढरपूर याला जेरबंद केले व मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच सी सी टी व्ही फुटेज वरून कॉटन एक्स्पो, स्टेशन रोड या दुकानात रु ३६हजार रुपयांची चेन चोरी उघडकीस आणून प्रिया अशोक भोसले,वय,२७ रा. मंगळवेढा, या महिला आरोपीस अटक केली, तसेच दि७फेब्रुवारी रोजी देशी पिस्तूल बाळगणाऱ्या तीन आरोपींना के बी पी कॉलेज चौकातून अटक करण्यात आली, रोहित उर्फ बिल्ला सुभाष घोडके वय २०,रा. वालचंदनगर ,ता .इंदापूर,जि. पुणे अनिल दिलीप लवटे ,वय २३,रा, मेदड ,ता .माळशिरस व सोमनाथ राहुल भोसले ,वय २९ ,रा दहिगाव रोड ,नातेपुते,ता .माळशिरस या तीन युवकांना अटक करण्यात आली. याचप्रमाणे जबरी चोरी करणाऱ्या टोळीस शिताफीने पकडले,दि ३०जानेवारी रोजी तुषार भीमराव इंगळे,वय,२६ हा उसाचा ट्रॅक्टर घेऊन निघाला असता लिंक रोड येथे मोटारसायकल आडवी लावून लुटण्यात आले होते, या गुन्ह्यात गणेश शंकर शिंगाडे, वय २६ रा ईसबावी, पंढरपूर, व रोहित चौगुले वय २५,रा कुंभार गल्ली पंढरपूर या दोन जणांना अटक करण्यात आली, दि ३०जानेवारी रोजी राजश्री संतोष भाळवणकर वय ,४५,रा घोंगडे गल्ली,पंढरपूर यांचे मिनी गंठण हिसकावून पळवून नेले होते,या प्रकरणी सुरज दत्तात्रय बंदपट्टे,वय १९,राजू तिम्मा बंदपट्टे वय २२,दोघे रा महात्मा फुले चौक ,संत पेठ पंढरपूर यांना अटक करण्यात आली आहे या सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव,डी वाय एस पी विक्रम कदम,पोलीस निरीक्षक अरुण पवार,राजेंद्र मगदूम,राजेश गोसावी,शरद कदम,बीपीनचंद्र ढेरे,सुरज हेंबाडे, इरफान मुलाणी,इरफान शेख,शोएब पठाण,राकेश लोहार,सुनील बनसोडे,सुजित जाधव,समाधान माने,विनोद पाटील,अर्जुन केवळे, कपिल माने,शहाजी मंडले यांच्या पथकाने पार पाडली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button