Pandharpur

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पंढरीत मार्गदर्शन.

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पंढरीत मार्गदर्शन.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पत्रकार मंडळींसाठी यु ट्यूब चॅनेल,वेबपोर्टल संबंधित मार्गदर्शक सूचना आणि महत्वपूर्ण माहिती पंढरपूर येथील सुप्रसिद्ध संगणकतज्ञ अतुल बहिरट यांनी दिली,यावेळी व्यासपीठावर राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे, पंढरपूर शहराध्यक्ष श्री दत्ताजी पाटील, पंढरपूर मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रवीण नागणे, उपाध्यक्ष विजयकुमार कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना श्री बहिरट यांनी मौलिक, उपयुक्त मार्गदर्शन केले, ते म्हणाले सर्व पत्रकार बांधवांनी पत्रकारितेशिवाय ईतर पर्यायांचा विचार करावा, कारण नुसत्या पत्रकारितेवर उपजीविका चालणे शक्य नाही, अनेकजण पत्रकारितेचा वापर स्वार्थासाठी आणि संरक्षण करण्यासाठी करीत आहेत, पण यामुळे किंमत कमी होते, आजच्या काळात शेकडो पत्रकार झाले आहेत पण अनेकजणांना सखोल ज्ञान नसते,केवळ मिरवण्यासाठी कार्ड घेऊन फिरणारे,चिरीमिरी घेऊन बातम्या लावणाऱ्या लोकांनी या क्षेत्राची किंमत, प्रतिष्ठा कमी केली आहे, यु ट्यूब किंवा पोर्टल चालविताना कॉपी राईट करू नये, तसेच जाहिराती मिळविण्यासाठी काय करावे,आर एन आय कार्यालयाचे नियम,याविषयी सखोल मार्गदर्शन केले, यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी शेवडे,सचिव विश्वास पाटील,सहसचिव रफिक आतार, प्रसिद्धीप्रमुख चैतन्य उत्पात, संघटक सुरेखा भालेराव, नागटिळक ,नरेंद्र नागटिळक, सचिन कुलकर्णी, कबीर देवकुळे,विनोद पोतदार, नागेश काळे, बाहुबली जैन, सूत्रसंचालन रामकृष्ण बिडकर यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button