परंडा

परंडा  एस.बी.आय  आधिकाऱ्याच्यां मनमानी मुळे खातेधारकात संताप

परंडा एस.बी.आय आधिकाऱ्याच्यां मनमानी मुळे खातेधारकात संताप

वर्षा पासुन ए .टी .एम मशीन बंद जनतेच्या तक्रारीला केराची टोपली .

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि.१९

एस .बी आय परंडा शाखेच्या अधिकाऱ्यांची मनमानी मुळे खातेदार ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असुन अपुऱ्या जागे मुळे वाहतुकीची कोंडी तर एटीम मशीन बंद असल्याने ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे .

स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बॅकेचे भारतीय स्टेट बॅक मध्ये विलीनी करण झाल्यावर दोन्ही बॅकेचे कामकाज परंडा शहरातील मंडई पेठेतील अरूंद रस्त्यावर असलेल्या शाखेत सुरू झाले या मुळे पुर्वीच्या दोन्ही बॅकेचे हाजारो खातेदार एकाच शाखेत वर्ग झाल्याने बँकेत प्रचंड गर्दी वाढली आहे अपुऱ्या जागेमुळे ग्राहकांना थांबन्यासाठी जागा नसल्याने अनेक वयोवृद्ध खातेदारांना गुदमरन्याची वेळ आली तसेच बँके समोर वाहनां साठी पार्कींग ची सोय नसल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्या मुळे नागरीका मधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे .

बॅकेचे स्थलांतर करावे अशी लेखी मागणी वेळोवेळी करण्यात आली मात्र बँक आधीकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवीली या बँकेच्या आधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे संताप व्यक्त होत आहे .

[ ]

दोन्ही बँकेचे विलीनीकरण झाल्याने एसबीआय चे पुर्वीची एटीएम मशीन बंद करण्यात आली आहे या मुळे खातेदारांना पैसे काढण्या साठी गैरसोय होत आहे तसेच नवीन एटीम चे पीन तयार करण्या साठी एसबीआय बॅकेचे परंडा येथे एटीएम मशीन नसल्याने बार्शी , कुईवाडी येथे जावे लागत आहे . वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन खातेदारांची गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button