Jalgaon

तुफान पावसानंतर पालघर रेड अलर्ट तर औरंगाबाद आणि जळगाव ला येलो अलर्ट..!पाऊस होईल कमी..

तुफान पावसानंतर पालघर रेड अलर्ट तर औरंगाबाद आणि जळगाव ला येलो अलर्ट..!पाऊस होईल कमी..

गेल्या आठवडाच्या तुफान पावसानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात फक्त पालघर रेड अलर्टला असून इतर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.उत्तर महाराष्ट्रा मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.त्यामुळे थोडा दिलासा मिळणार आहे.

येलो अलर्ट असलेले जिल्हे..

जळगाव
औरंगाबाद
जालना
बुलडाणा
अकोला

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे..

नंदूरबार
धुळे
नाशिक
ठाणे
पुणे
सातारा
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग

हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज अतिशय अचूक ठरला.आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, नागपूर, बुलडाणा, जामनेर, लातूर, नाशिक सगळीकडेच पावसाने जोरदार हजेरी लावली.
संपुर्ण राज्यात पडलेल्या या पावसामुळे कुठे पिकांना जीवदान मिळालं तर कुठे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

जवळजवळ 18 जिल्ह्यात पाऊस पडणार नाही त्यामुळे कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.विदर्भात पाऊस थोडी विश्रांती घेईल.अकोला आणि बुलडाणा , जळगाव, औरंगाबाद, जालन्याला देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button