Pune

अंकिता पाटील यांच्या प्रयत्नातून बावडा कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर…

अंकिता पाटील यांच्या प्रयत्नातून बावडा कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर…

दत्ता पारेकर पुणे

पुणे : कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये, त्यांचा जीव वाचावा यासाठी जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून बावडा कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिला आहे.
बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. कपिलकुमार वाघमारे यांच्याकडे अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त केला.
यावेळी बावडा ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामपंचायत सदस्य दादा कांबळे, बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.कपिलकुमार वाघमारे , डॉ हिना काझी, लॅब टेक्निशियन डॉ. राजेंद्र अनपट व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बावडा ग्रामपंचायतीची सदस्य आणि ग्रामस्थ यांनी अंकिता पाटील यांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button