Aurangabad

‘बीएचआर’ घोटाळ्या प्रकरणी औरंगाबाद येथील एका दैनिकाच्या मालकास अटक

‘बीएचआर’ घोटाळ्या प्रकरणी औरंगाबाद येथील एका दैनिकाच्या मालकास अटक

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी, भुसावळ, औरंगाबाद धुळे, मुंबई, अकोला, पुणे या सहा जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी करत तब्बल बारा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये औरंगाबादेतील एका दैनिकाच्या मालकास अटक करण्यात आली आहे.

जळगाव शहरातून भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना पोलिसांनी सहा वाजता तब्यात घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्षाला ही ताब्यात घेण्यात आलेले आहे. या प्रकरणी डेक्कन, पिपंरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे यापुर्वी गोळा केले आहेत.

त्यात प्रामुख्याने जळगावमधील वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहेत.

याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button