sawada

बाहेर गावातुन सावदा येथे आलेले दोघांचा कोरोना टेस्ट नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरीकांत चिंता!

बाहेर गावातुन सावदा येथे आलेले दोघांचा
कोरोना टेस्ट नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरीकांत चिंता!

युसूफ शाहा सावदा

सावदा : संपूर्ण जगाला कळून चुकलेल्या कोरोना महामारी पासून गेल्या काही काळा नागरिकांना दिलासा मिळाला असता पुन्हा या माहामारीची दुसरी लाट उठल्याने राज्याची यंत्रणा पूर्ण ताकतीने लोकांचे जीव वाचविण्या करिता मैदानात उतरलेली आहेत

सध्या या कोरोना महामारीची आलेली दुसरी लाट मध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे बाहेर गावातून स्वामीनारायण नगर परिसरात असलेल्या दोन रुग्णांची रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाने शिरकाव केलेला आहे

या बाबत सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की, येथील स्वामीनारायण नगर मध्ये अमरावतीहून आलेल्या २६ळ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय स्त्री यांची कोरोना टेस्ट घेतली असता या दोघांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव आल्याने नागरिकांत चिंता व्यक्त केली जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम यंत्रणांकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले

तसेच जळगांव जिल्ह्यातील दि २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नवीन २७९ कोरोना बाधित रुग्ण मिळालेली आहेत तरी सर्वांनी शासनाने लागू केलेले नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रतेकांनी अचुकपणे मास्क चा वापर करावे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button