Ratnagiri

अन्यथा माझे पुढचे उपोषण माजी शिवसेनेचे मंञी रामदास भाई कदम यांच्या विरोधात:सुशिलकुमार पावरा

अन्यथा माझे पुढचे उपोषण माजी शिवसेनेचे मंञी रामदास भाई कदम यांच्या विरोधात:सुशिलकुमार पावरा

रत्नागिरी : सौ.सुवर्णा पत्की पोलीस निरीक्षक खेड यांची बदली रद्द करा.श्री. रामदास कदम यांच्या मर्जीचे कोणतेच पोलीस निरीक्षक खेड येथे नियुक्त करू नका .अन्यथा श्री. रामदास कदम यांच्या विरोधात माझे पुढील 129 वे उपोषण असेल.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री श्री. रामदास कदम यांच्या विधान परिषदेत मागणी नूसार सौ.सुवर्णा पत्की पोलीस निरीक्षक खेड यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय गृहमंत्री श्री.अनिल देशमुख साहेब यांनी घेतला.हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. खेड येथील पोलीस ठाण्यातील वातावरण आपणास माहित नसेल. कारण रामदास कदम यांच्या मर्जीचे पोलीस निरीक्षक खेड येथे आल्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्याचा शिकार मी स्वतः झालेलो आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिकवतात म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकावर रामदास कदम यांच्या मर्जीने खोटा गुन्हा दाखल होतो.हे एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. हे गुन्हे कमी करायचे असतील तर खेड येथे प्रामाणिक पोलीस निरीक्षक व इतर पोलीस असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा सौ. सुवर्णा पत्की मॅडम यांचे खेड येथे प्रामाणिकपणे काम सुरू आहे. सर्व धर्म व समाजासाठी त्यांचे काम चांगले आहे. त्यांनी 2 वर्षाच्या कालावधीत उत्तम काम केलेले आहे.अशा पोलीस अधिकारी यांचा सन्मान व्हायला पाहिजे. माञ त्यांच्या वर रामदास कदम कडून अश्लील शेरेबाजी विधानपरिषदेत झालेली आहे.हे तर कर्तव्य दक्ष महिला पोलीस अधिकारी यांचा अपमानास्पद आहे.
महोदय,खेड तालुक्यातील मागील व सध्याची सत्य परिस्थिती आपणास माहित नाही. रामदास कदम यांच्या मर्जीचे पोलीस निरीक्षक खेड येथे आल्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले. अनेक निरपराध शिक्षक व लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले आहेत.तेव्हा सौ.सुवर्णा पत्की यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावा. व रामदास कदम यांच्या मर्जीचे पोलीस निरीक्षक खेड येथे नेमण्यात येऊ नये. हीच नम्र विनंती. अन्यथा रामदास कदम यांच्या विरोधातच माझे पुढील 129 वे उपोषण राहील. याची नोंद घ्यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब व पोलीस अधिक्षक रत्नागिरी यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button