Usmanabad

उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाईन भुसंपादन संदर्भात आढावा बैठक संपन्न.

उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाईन भुसंपादन संदर्भात आढावा बैठक संपन्न.

सलमान मुल्ला उस्मानाबाद

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (धाराशिव) येथे उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाईन भुसंपादन संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची, महसूल विभाग व उस्मानाबाद -सोलापूर जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली.

सदरील बैठकीत सोलापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गात उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील 42 गावे येतात तसेच हा रेल्वे मार्ग ८० कि.मी. लांबीचा असून पहिल्या टप्प्यात ० ते २० कि.मी. रेल्वे लाईनचा रेल्वे विभागाच्या डिमार्केशन करणाऱ्या एजन्सीने सविस्तर प्रस्ताव मोजणी विभागास देण्यात यावा अशी मागणी खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून करण्यात आली.

यातील ६० ते ८० कि.मी.चा भूसंपादन प्रस्ताव जुलै, ० ते २० कि.मी.चा भूसंपादन प्रस्ताव ऑगस्ट, ६० ते ४० कि.मी.चा भूसंपादन प्रस्ताव सप्टेंबर, ४० ते २० कि.मी.चा भूसंपादना प्रस्ताव ऑक्टोबर महिना अखेर पर्यंत रेल्वे विभागाने महसूल विभागा प्रस्ताव देण्यात यावेत. असे निर्देश संबंधित अधिकारी वर्गास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

सदरील बैठकीस खा.ओमराजे निंबाळकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय, सोलापूर अरुण गायकवाड, उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद डॉ.योगेश खरमटे, स.का.अभियंता मध्यरेल्वे सोलापूर राजनारायन भगवानदीन, उपमुख्य अभियंता पंकज धावारे, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, माजी उपसरपंच क.तडवळे तुलसीदास जमाले, रेल्वे विभाग, महसूल विभाग, भूमिअभिलेखचे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button