Amalner

Amalner: प स चे माजी सभापती डॉ दीपक पाटील यांच्या प्रयत्नातून मांडळ येथे लंपी स्किन आजाराचे जनावरांना लसीकरण

Amalner: प स चे माजी सभापती डॉ दीपक पाटील यांच्या प्रयत्नातून मांडळ येथे लंपी स्किन आजाराचे जनावरांना लसीकरण

अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. दीपक पाटील यांच्या प्रयत्नांनी मांडळ येथे जनावरांचे लंपी स्कीन आजाराचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांमध्ये लंपी स्कीन आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. या आजाराचा फैलाव हा गोचीड-गोमाशा यांच्या चाव्याने होतो. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झपाट्याने होत आहे.

या अनुषंगाने मांडळ गावातील ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. दिपक पाटील यांच्या प्रयत्नाने बुधवार स 8 वाजता पशुवैद्यकीय दवाखाना वावडे यांच्या मार्फत लंपी रोगाचे लसीकरण बाजारपेठेत करण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी बांधवांनी आपल्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण करून घेतले. पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकेश पाटील, डॉ. दीपक पाटील, डॉ. भटू सैदाने, गावातील सरपंचचे पती विजय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर, नूतन विकास सोसायटीचे
माजी चेअरमन जितेंद्र पाटील, नवल धनगर, राजेंद्र पाटील,संतोष पाटील इ सह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button