gadchiroli

मौशीखांब येथे दूध व्यवसाय व दुग्धविकास कार्यशाळेचे आयोजन

गडचिरोली जिल्ह्यात उद्योग क्रांती पाठोपाठ श्वेतक्रांती व निलक्रांती आणणार

आमदार डॉ देवरावजी होळी

मौशीखांब येथे दूध व्यवसाय व दुग्धविकास कार्यशाळेचे आयोजन

मौशिखांब ज्ञानेश्वर जुमनाके

गडचिरोली जिल्ह्यात उद्योगासाठी व विविध व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती असूनही नियोजनाअभावी हा जिल्हा अजूनही उद्योगाच्या दृष्टीने मागासलेलाच आहे. जिल्ह्यात दूध व्यवसायाला व मत्स्य व्यवसायाला चालना दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात उद्योग क्रांती सह श्वेतक्रांती व निलक्रांती घडवून या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मौशिखांब येथील दूध व्यवसाय व दुग्धविकास कार्यशाळेच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

मौशीखांब येथे दूध व्यवसाय व दुग्धविकास कार्यशाळेचे आयोजनजिल्ह्यात प्रथमच मेक इन गडचिरोलीच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पुढाकाराने सुनीता डेअरी फार्म प्रायव्हेट लिमिटेड मौशिखां ब, जिल्हा गडचिरोली उमेद, तालुका गडचिरोली पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध व्यवसाय व दुग्ध विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते

मौशीखांब येथे दूध व्यवसाय व दुग्धविकास कार्यशाळेचे आयोजनया कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश बारसाकडे ,गडचिरोली पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलासजी दशमुखे भाजपा तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहणे पंचायत समिती सदस्य शंकर नैताम , आरमोरी पंचायत समिती सदस्य विवेक खेवले पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे अधिकारी यांचेही मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मेकिंग गडचिरोलीचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीनिवासजी दोंतुला ,संचालन योगाजी बनपुरकर, यांनी तर कार्यक्रमाचे आभार जगदीश ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला

Leave a Reply

Back to top button