Faijpur

फैजपूर येथे फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात निर्यातक्षम केळी उत्पादन कार्यशाळेचे आयोजन

फैजपूर येथे फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात निर्यातक्षम केळी उत्पादन कार्यशाळेचे आयोजन

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : कृषी विज्ञान केंद्र,पाल व कृषी विभाग,जळगांव आणि अपेडा (ऍग्रीकल्चर प्रोसिड फूड अँड एक्स्पोर्ट डेवलोपमेंट औथोरिटी ऑफ इंडिया) या संस्थेच्या वतीने दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर येथे एक दिवसीय निर्यातक्षम केळी उत्पादन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माननीय श्री.शिरीषदादा चौधरी(आमदार,रावेर/यावल) यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच तांत्रिक चर्चासत्रात डॉ. सी डी बडगुजर (प्रमुख शास्त्रज्ञ केळी संशोधन केंद्र जळगाव) डॉ.के बी पाटील (केळी तज्ञ व उपाध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम जळगाव) मा. श्री लोकेश गौतम (नोडल ऑफिसर,अपेडा मुंबई) श्री किरण जाधव (शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद जळगाव) मा.श्री अजहर पठाण (केळी निर्यातदार रिलायन्स कंपनी मुंबई)हे मार्गदर्शक उपलब्ध राहणार आहे. एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मार्फत निर्यातक्षम केळी उत्पादन वाढावे यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे पाल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून व अपेडा या संस्थेच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यातून निर्यातक्षम केळी उत्पादन होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. महेश महाजन यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button